दिल्ली मॉडेलच्या धर्तीवर शाळा सुधारण्याची घोषणा फक्त स्टंटबाजी ठरू नये -यशवंत कांबळे, आम आदमी पार्टी

bpcauthor bpcauthor
1 Min Read

पिंपरी, दि. १० (पीसीबी)-पिंपरी चिंचवड महानगरपालिके मध्ये सध्या प्रशासकीय राजवट सुरू आहे. या प्रशासकीय राजवटीमध्ये दिल्लीमधील सरकारी शाळांचे जे अप्रतिम मॉडेल उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या पुढाकाराने संपूर्ण जगामध्ये नावारूपाला आले आले त्याची पाहणी करण्यासाठी महानगर पालिका शाळांचे शिक्षक व 35 अधिकारी यांचे शिष्ट मंडळ नुकतेच दिल्लीला जाऊन आले. आम आदमी पार्टी या दौऱ्याचे मनापासून स्वागत करते अशी भावना आपचे मीडिया प्रमुख यशवंत कांबळे ह्यांनी व्यक्त केली.

काही वर्षांपूर्वी सुद्धा पालिकेतील नगरसेवक व शिक्षण विभागाचे अधिकारी दिल्लीला जाऊन केजरीवाल सरकारच्या “दिल्ली मॉडेलची” पाहणी करून आले होते. त्यावेळेस सुद्धा खूप गाजावाजा होऊन सरकारी शाळांमध्ये सुधारणा करू त्याचप्रमाणे दिल्लीतील मोहल्ला क्लिनिक प्रमाणे पिंपरी चिंचवड मध्ये जिजाऊ क्लिनिक सुरू करू असे आश्वासन देण्यात आले होते, परंतु प्रत्यक्षामध्ये ते आजपर्यंत पूर्णत्वास आले नाही, त्यामुळे यावेळेस तरी आयुक्त पालिकेच्या सरकारी शाळांचा व सरकारी दवाखान्यांचा दर्जा उंचावून पिंपरी चिंचवड करांना दिलासा देतील त्याचप्रमाणे जिजाऊ क्लिनिक सुद्धा सर्वत्र सुरू करावे, अशी मागणी यशवंत कांबळे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

Share This Article