भोसरी जमीन घोटाळा प्रकरणात एकनाथ खडसेंना जामीन मंजूर

bpcauthor bpcauthor
1 Min Read

मुंबई, दि. १२ (पीसीबी) – भोसरी जमीन घोटाळा प्रकरणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना नियमित जामीन मंजूर झाला आहे. ‘माझा न्याय व्यवस्थेवर विश्वास आहे’, अशी प्रतिक्रिया खडसेंनी ‘साम टीव्ही’शी बोलताना दिली.

भोसरी जमीन घोटाळ्याप्रकरणी एकनाथ खडसे यांच्यावर ईडीने गुन्हा दाखल केला होता. त्या गुन्ह्यामध्ये गुरुवारी न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. त्यानंतर एकनाथ खडसे म्हणाले की, ईडीने केलेली कारवाई चुकीची असल्याचं आम्ही कोर्टात मांडलं. माझा न्याय व्यवस्थेवर विश्वास असून जामीन मंजूर झाला आहे.

दरम्यान, भोसरी कथित जमीन गैरव्यवहार प्रकरणात एसीबीने दाखल गुन्हा रद्द करण्याची याचिका हायकोर्टाने सोमवारी फेटाळली होती. त्यामुळे मुंबई हायकोर्टाकडून राष्ट्रवादी नेते एकनाथ खडसे यांना झटका बसला होता. आता दुसऱ्या प्रकरणात दिलासा मिळाला आहे

Share This Article