पुन्हा भीषण अपघात…! १५ जणांचा चिरडून जागीच मृत्यू

1 Min Read

शिरपूर,दि.०५(पीसीबी) – मुंबई आग्रा महामार्गावर पळासनेर गावाजवळ भीषण अपघात झाला आहे. ब्रेक फेल झाल्याने कंटेनर एका हॉटेलमध्ये शिरला. या घटनेत १५ जणांचा चिरडून जागीच मृत्यू झाला तर तर पंधरा ते वीस जण जखमी झाले आहेत. मृत्यू पडलेल्यांची संख्या अजून वाढण्याची भीती आहे.

मिळालेल्या माहितीनुसार हा अपघात धुळे – मुंबई – आग्रा महामार्गावर घडला आहे. पळासनेर एक भरधाव वेगातील कंटेनरचे ब्रेक फेल झाल्याने कंटेनर एका हॉटेलमध्ये शिरला. यावेळी हॉटेल मधील १५ जणांचा चिरडून जागीच मृत्यू झाला. या भीषण अपघातात पंधरा ते वीसजण जखमी झाल्याची माहिती आहे. दरम्यान, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

मुंबई-आग्रा महामार्गावर शिरपूर तालुक्यातील पळासनेर हे गाव मध्य प्रदेशच्या सीमेवर हा अपघात झाला आहे. याच गावाजवळ साधारणतः आज दुपारी १२ वाजता एक कंटेनर थेट हॉटेलमध्ये शिरला. घटनास्थळी पाच जणांचा चिरडून मृत्यू झाला तर काही जणांचा दवाखान्यात नेतांना मृत्यू झाला. अपघात झाला त्यावेळी हॉटेलच्या बाहेर इतरही अनेक वाहानं उभी होती. कंटेनर हॉटेलमध्ये शिरताना त्या वाहानांनाही धडकला.

Share This Article