खळबळजनक…! ७ वर्षीय मुलीवर १२ वर्षाच्या मुलाने केला बलात्कार…

bpcauthor bpcauthor
1 Min Read

पुणे,दि.३०(पीसीबी) – पुणे जिल्ह्यातील एका शाळेत 7 वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. एका 12 वर्षांच्या मुलाने शाळेच्या बाथरूममध्ये 7 वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्याचं सांगण्यात येत आहे. एका वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, या प्रकरणाची माहिती मिळताच पुणे ग्रामीण पोलिसांनी तपास सुरू केला आहे. मुलीच्या कुटुंबीयांना या घटनेची माहिती पोलिसांना दिली.

मुलीच्या कुटुंबीयांनी पोलिसांशी संपर्क साधल्यानंतर बुधवारी पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आलं. अल्पवयीन मुलाविरुद्ध एफआयआर दाखल केलेल्या पुणेपोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्याने सांगितलं की, ही घटना दोन दिवसांपूर्वी शाळेच्या आवारातील बाथरूममध्ये घडली होती. मुलीने घडलेला प्रकार आईला सांगितला. त्यानंतर कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यात संपर्क साधून माहिती दिली.

आता या 12 वर्षीय मुलावर बलात्काराचा आरोप असून त्याला बाल न्याय मंडळाकडे पाठवण्यात आलं आहे. हे प्रकरण जिल्हा बालकल्याण समितीसमोर मांडण्यात आलं आहे. एका अधिकाऱ्याने सांगितलं की, मुलगी आणि तिच्या कुटुंबीयांना समुपदेशनाचा आधार दिला जात आहे. या संपूर्ण प्रकरणावर वरिष्ठ पोलीस अधिकारी लक्ष ठेवून आहेत. पोलिसांनी 12 वर्षीय मुलाविरोधात भारतीय दंड संहितेच्या कलमांनुसार बलात्कार आणि लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण (POCSO) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

Share This Article