सोसायटीच्या लिफ्टमध्ये अल्पवयीन मुलीचा विनयभंग

1 Min Read

पिंपरी, दि.८ (पीसीबी)- सोसायटीच्या लिफ्टमधून जात असलेल्या अल्पवयीन मुलीचा एका 30 वर्षीय व्यक्तीने विनयभंग केला. ही घटना 4 जून रोजी बोऱ्हाडेवाडी मोशी येथे घडली.

याप्रकरणी पिडीत मुलीच्या वडिलांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार मनोज मुरलीधर पवार (वय 30, रा. ओटास्कीम, निगडी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची मुलगी तिच्या काकाच्या घरी गेली होती. काका राहत असलेल्या सोसायटीमधील लिफ्टमधून जात असताना आरोपीने पिडीत मुलीसोबत गैरवर्तन केले. ‘तू मला आवडतेस’ असे म्हणून तिचा विनयभंग केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

Share This Article