AAP भोसरी विधानसभा मतदार संघ:रिक्षा तळावर फ्लेक्स लावून सदस्य नोंदणीला सुरवात

1 Min Read

महिला आघाडीच्या अध्यक्षा सीताताई केंद्रे यांचा पुढाकार

भोसरी, दि. १० (पीसीबी) – शहरातील भोसरी विधानसभा मतदार संघात ‘आम आदमी पार्टी’तर्फे बुधवार पासून सदस्य नोंदणी अभियानाला सुरुवात करण्यात आली आहे. भोसरी एम आय डी सी तील ‘जे’ ब्लॉक येथील रिक्षा तळावर 20 रिक्षांना फलक व बॅनर लावून ऑनलाईन व प्रत्यक्ष आम आदमी पार्टीचे सदस्य व्हा,असे आवाहन करण्यात आले. यावेळी ‘आप’महिला आघाडीच्या अध्यक्षा यांनी सांगितले की,आम आदमी पार्टी देशात सामान्य जनतेच्या आकांक्षा परिपूर्ण करणारे व्हिजन मिशन घेऊन दिल्ली,पंजाब येथे लोकाभिमुख कार्य करत आहे.

भोसरी विधानसभा मतदारसंघात कष्टकरी श्रमिक वर्गाची मोठी संख्या आहे,येथील चाळीचाळीत,छोट्या घरकुलात राहणाऱ्या श्रमिक,अंगमेहनती महिला,रिक्षा,पथ व्यावसायिक तसेच औद्योगिक कामगारांच्या आरोग्य,शिक्षण,पाणी पुरवठा ईई विविध समस्या आहेत. सभासद नोंदणी अभियाना अंतर्गत महिला आघाडीच्या माध्यमातून आमचे नेते अरविंद केजरीवाल यांच्या मार्गदर्शनाखाली घरोघरी जाऊन सदस्य नोंदणीला सुरवात झाली आहे.सामान्य माणूस व रिक्षाचालक यांचे अतूट व विश्वासाचे नाते असते.त्यामुळे रिक्षाना फलक व फ्लेक्स लावून शहारात आम आदमी पार्टीचा प्रचार सुरू करण्यात येत आहे.

यावेळी वैजनाथ शिरसाट (आम आदमी पार्टी संपर्क प्रमुख पिंपरी चिंचवड),प्रकाश हगवणे(प्रवक्ते, म आदमी पार्टी पिंपरी चिंचवड),दत्तात्रय काळजे (कार्याध्यक्ष,भोसरी विधानसभा)
माया सांगवे,दत्तात्रय सांगवे आदी उपस्थित होते.

Share This Article