तडीपार गुंडाला शस्त्रासह अटक

1 Min Read

पिंपरी, दि. २५ (पीसीबी) – पुणे जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार केलेल्या गुंडाला गुन्हे शाखा युनिट दोनने शस्त्रासह अटक केली. ही कारवाई रविवारी (दि. 23) सायंकाळी सात वाजता भाटनगर पिंपरी येथील सरकारी दवाखान्याजवळ केली.

विनोद गणेश जाधव (वय 24, रा. भोसरी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार शिवाजी मुंढे यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी विनोद जाधव याला पिंपरी चिंचवड पोलिसांनी दोन वर्षांसाठी पुणे जिल्ह्यातून तडीपार केले आहे. त्याचा तडीपारीचा कालावधीत संपण्यापूर्वी तो कोणतीही परवानगी न घेता शहरात आला. त्याने हत्यार बाळगले असल्याची माहिती मिळाली असता पोलिसांनी त्याला अटक केली. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

Share This Article