भर दिवसा महिलेस लुटले

1 Min Read

पिंपरी, दि. २८ – दुचाकीवरून जाणाऱ्या महिलेला अडवून लुटले ही घटना सोमवारी (दि. 27) दुपारी अडीच वाजताच्या सुमारास मोहननगर चिंचवड येथे घडली.

करण उर्फ ससा ससाने (रा. दत्तनगर चिंचवड), शुभम फरतडे (रा. महात्मा फुले नगर चिंचवड) आणि त्याचा एक साथीदार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी महिलेने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला त्यांच्या दुचाकीवरून महात्मा फुले नगर येथून जात होत्या. त्यावेळी आरोपींनी फिर्यादी महिलेस अडवले. त्यांच्या शर्टच्या खिशातून बाराशे रुपये रोख रक्कम जबरदस्तीने काढून घेतली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

Share This Article