लाडकी लेक मी संतांची, मजवरी कृपा बहुतांची… ‘लेक लाडकी’ योजना नव्या स्वरूपात

1 Min Read

मुंबई, दि.९ (पीसीबी) राज्याच्या अर्थसंकल्पात सर्व घटकांना खूश ठेवण्याचा प्रयत्न उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. शेतकरी, कामगार, कारखानदार, महिला, जेष्ठ नागरिक, विद्यार्थी, बेरोजगारांसह जाती धर्माचा आणि संत महात्मायंच्या स्मारकांसाठी घोषणांची खैरात आहे. सर्व महत्वाच्या घोषणांची गोषवारा मुद्दे पुढीलप्रमाणे आहे.

– मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी’ योजना आता नव्या स्वरूपात
– पिवळ्या आणि केशरी रेशनकार्डधारक कुटुंबांतील मुलींना लाभ
– जन्मानंतर मुलीला 5000 रुपये
– पहिलीत 4000 रुपये, सहावीत 6000 रुपये
– अकरावीत 8000 रुपये
– मुलगी 18 वर्षांची झाल्यावर 75,000 रुपये

Share This Article