अवघ्या वीस मिनिटात दुचाकी चोरीला

1 Min Read

भोसरी, दि. २४ (पीसीबी) – कासारवाडी येथील एका हॉटेल समोरून दुचाकी चोरीला गेली. ही घटना ८ फेब्रुवारी रोजी रात्री साडेदहा वाजता अवघ्या वीस मिनिटात घडली.

दीपक शशिराव शिंदे (वय ४१, रा. कासारवाडी) यांनी याप्रकरणी गुरुवारी (दि. २३) भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शिंदे यांनी त्यांची १५ हजार रुपये किमतीची दुचाकी (एमएच १४/एफडब्ल्यू २४४४) कासारवाडी येथील एका हॉटेल समोर पार्क केली. अवघ्या वीस मिनिटात त्यांची दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेली. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

Share This Article