किरकोळ वादातून महिलेला धक्काबुक्की करत विनयभंग

1 Min Read

थेरगाव, दि. १३ (पीसीबी) – किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून महिलेला धक्काबुक्की व शिवीगाळ करत विनयबंग करण्यात आला आहे. हा प्रकार डांगे चौकात शुक्रवारी (दि.10) रात्री घडला आहे.

महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून वाकड पोलीस ठाण्यात रोहन संजय धुमाळ (वय 22 रा. मुळशी) याला पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व आरोपी यांच्यात हिंजवडी येथील डान्स स्टुडीओ येथे किरकोळ कारणावरून भांडण झाले होते. याच रागातून आरोपीने फिर्यादी यांच्या स्टुडीओची तोडफोड करत फिर्यादी यांना धक्काबुक्की करत गैरवर्तन केले व शिवीगाळ केली. यावेळी फिर्यादीचे पती व पार्टनर मध्ये आले असता त्यांनाही जिवे मारण्याची धमकी दिली. यावरून वाकड पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

Share This Article