चिंचवड येथील झोपडपट्टी टेकडीवर एकाचा डोक्यात वार करून खून

1 Min Read

चिंचवड, दि. ६ (पीसीबी) – चिंचवड येथील अंजठानगर भागातील झोपडपट्टी टेकडीवर एकाचा डोक्यात वार करून खून करण्यात आला आहे. हा खून शुक्रवारी (दि.3) ते शनिवार (दि.4) या कालावधीत घडला आहे.

मयताची ओळख पटली असून बालाजी संतोष तिवारी (वय 33 रा.देहुगाव मुळ बिहार) असे त्याचे नाव असून त्याचा भाऊ उत्तमकुमार संतोष तिवारी (वय 19 रा.चिखली) याने रविवारी (दि.5) चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दतिली असून पोलिसांनी अज्ञाता विरोधात खूनाचा गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बालाजी याचा अज्ञात इसमाने कोणत्यातरी धारदार शस्त्राने डोक्यात वार करून खून केला आहे. त्याचा मृतदेह हा ढोपडपट्टी टेकडी येथील दोन पाण्याच्या टाकीच्या आतमध्ये होता. त्याचा खून कोणी व का केला हे अद्याप कळू शकलेले नाही. चिखली पोलीस याचा पुढील तपास करत आहेत.

Share This Article