महापालिका अतिरिक्त आयुक्तांच्या कामकाजाचे फेरवाटप

2 Min Read

पिंपरी, दि. ११ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील तीन अतिरिक्त आयुक्तांच्या कामकाजाचे फेरवाटप करण्यात आले आहे. आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी अतिरिक्त आयुक्तांच्या कामकाजाची अदलाबदल केली आहे.

महापालिकेत प्रतिनियुक्तीवरील प्रदिप जांभळे, जितेंद्र वाघ आणि स्थानिक अधिका-यांमधून उल्हास जगताप असे तीन अतिरिक्त कार्यरत आयुक्त आहेत. आयुक्त शेखर सिंह यांनी अमृत, स्मार्ट सिटी, जेएनएनयूआरएमचे विशेष प्रकल्प, नगररचना आणि दक्षता व गुणनियंत्रण या सर्व विभागांचे कामकाज स्वतःकडे ठेवले आहे.

अतिरिक्त आयुक्त (एक) प्रदीप जांभळे यांच्याकडे उद्यान व वृक्षसंवर्धन, अग्निशमन, शिक्षण, माध्यमिक शिक्षण, स्थापत्य (उद्यान), अतिक्रमण, विद्युत मुख्य कार्यालय, करसंकलन, पाणीपुरवठा व जलनि:सारण, जलशुद्धीकरण केंद्र सेक्टर 23, मध्यवर्ती भांडार, बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण, स्थापत्य मुख्य कार्यालय, समाज विकास, सर्व क्षेत्रीय कार्यालये व क्षेत्रीय कार्यालयांतर्गत येणारे सर्व विभाग (सार्वजनिक वाचनालय, प्रेक्षागृहांसह) आणि आपत्ती व्यवस्थापन असे 16 विभाग त्यांच्याकडे सोपविण्यात आले आहेत.

अतिरिक्त आयुक्त (दोन) जितेंद्र वाघ यांच्याकडे प्रशासन, माहिती व तंत्रज्ञान, पशुवैद्यकीय (बहिणाबाई चौधरी प्राणी संग्रहालय), क्रीडा, स्थापत्य (प्रकल्प), वैद्यकीय मुख्य कार्यालय, यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय, आरोग्य, आकाशचिन्ह व परवाना विभाग, निवडणूक व जनगणना, भूमि आणि जिंदगी, पर्यावरण अभियांत्रिकी, कायदा आणि बीआरटीएस प्रकल्प अशा 14 विभागाचे कामकाज त्यांच्याकडे सोपविण्यात आले आहे.
तर, अतिरिक्त आयुक्त (तीन) उल्हास जगताप यांच्याकडे सुरक्षा, कार्यशाळा, नगरसचिव, माहिती व जनसंपर्क, झोनिपू, आयटीआय मोरवाडी व कासारवाडी, नागरी सुविधा केंद्र, अभिलेख कक्ष, बीएसयुपी, ई्डब्ल्यूस प्रकल्प, स्थानिक संस्था कर आणि कामगार कल्याण अशा 12 विभागाचे कामकाज देण्यात आले आहे.

Share This Article