दुकानात घुसून मंगळसूत्र हिसकावले

PCB Admin
1 Min Read

 शिरगाव, दि. १० (पीसीबी)  – शिरगाव येथे दुकानात घुसून दुकानदार महिलेचे मंगळसुत्र हिसकावले. हा प्रकार गहुंजे रोडवर सोमवारी (दि.9) दुपारी साडे चार वाजता घडला.

प्रीतम प्रकाश खोपकर (वय 55 रा. शिरगाव) यांनी शिरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून अनोळखी इसमावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा टेलरींग चा व्यवसाय असून सोमवारी त्या त्यांच्या दुकानात एकट्याच असताना आरोपी दुचाकीवरून तेथे आला. त्याने फिर्यादी यांच्याकडे पिण्यासाठी पाणी मागितले, फिर्यादी यांनी त्याला पाणी दिले व त्या त्यांच्या शिलाई मशीन जवळ उभा राहिल्या. यावेळी चोरट्याने काही कळायच्या आत फिर्यादीच्या गळ्यातील 30 हजार रुपयांचे मिनी गंठण हिसकावून नेले. यावरून शिरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलीस चोरट्याचा शोध घेत आहेत.

Share This Article