महाराष्ट्रात येणार तब्बल २ लाख कोटींचे २२५ प्रकल्प; खुद्द पंतप्रधानांनी दिली माहिती

1 Min Read

गुजरात,दि.०३(पीसीबी) – महाराष्ट्रात २ लाख कोटींचे २२५ प्रकल्प मंजूर करण्यात आले असल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे. मुंबईत रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला असून यावेळी नियुक्तीपत्रांचं वाटप करण्यात आलं. यावेळी नरेंद्र मोदींनी संवाद साधत महाराष्ट्रात भविष्यात तरुणांसाठी रोजगाराच्या अधिक संधी उपलब्ध होतील असा विश्वास व्यक्त केला.

“स्टार्टअप, लघु उद्योगांना संभाव्य आर्थिक मदत सरकार देत आहे. जेणेकरुन तरुणांना आपलं कौशल्य दाखवण्याची संधी मिळेल. सरकारच्या प्रयत्नांमधून रोजगाराच्या संधी दलित, आदिवासी, महिलांना समान स्वरुपात उपलब्ध होत आहे,” अशी माहिती नरेंद्र मोदी यांनी दिली.

“गेल्या आठ वर्षात ८ कोटी महिला सेल्फ हेल्प ग्रुपशी जोडल्या गेल्या आहेत. त्यांना साडे पाच लाख कोटींची मदत देण्यात आली आहे. या ग्रुपशी जोडलेल्या महिला इतर महिलांनाही रोजगार देत आहेत,” असं मोदींनी सांगितलं.

Share This Article