शस्त्र बाळगल्या प्रकरणी तरुणास अटक

PCB Admin
1 Min Read

वाकड, दि. २ (पीसीबी) -शस्त्र बाळगल्या प्रकरणी वाकड पोलिसांनी एका तरुणाला अटक केली. ही कारवाई शनिवारी (दि. 1) मध्यरात्री दगडू पाटील नगर, थेरगाव येथे करण्यात आली.

अनिकेत संतोष कांबळे (वय 19, रा. दगडू पाटील नगर, थेरगाव) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्यानुसार पोलीस नाईक दत्तप्रसाद चौधरी यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीकडे शस्त्र असल्याची माहिती वाकड पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी अनिकेत कांबळे याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे एक कोयता मिळून आला. पोलिसांनी कोयता आणि बुलेट असा 50 हजार 150 रुपयांचा ऐवज जप्त केला. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

Share This Article