पिंपळे गुरवमधील फ्लॅटमध्ये आग

1 Min Read

पिंपरी,दि.०२(पीसीबी) – गुरुवारी रात्री पिंपळे गुरवमधील यशोदा पुरम सोसायटी मध्ये ७व्या मजल्यावर आग लागल्याची घटना घडली आहे.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अग्निशमन विभागाच्या पिंपरी मुख्यालयाने सांगितले की, गुरुवार रात्री 10.10 वा आग लागल्याची माहिती मिळाली होती. पिंपळे गुरवच्या यशोदापुरममधील एका बिल्डिंगच्या सातव्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये आग लागली होती.पिंपरी मुख्यालयाचा एक अग्निशमन बंब व रहाटणी केंद्राचे दोन अग्निशमन बंब घटनास्थळी पोहोचले.

अग्निशमन कर्मचारी पायऱ्यांनी फ्लॅटच्या दरवाजाजवळ पोहोचले.फ्लॅटचा दरवाजा बंद होता. त्यामुळे कुलूप तोडून आत प्रवेश करण्यात आला.फ्लॅटमधील सर्व लाकडी फर्निचर व इलेक्ट्रॉनिक उपकरणे जळून खाक झाले होती. अंदाजे दोन तासात पुर्ण आग विझवण्यात आली.

Share This Article