सायकलस्वार श्री.प्रशांत कुमार अपघाती मृत्यू प्रकरणी इंडो अथलेटिक्स सोसायटीतर्फे पोलिसांना निवेदन

bpcauthor
1 Min Read

पिंपरी दि. २४ (पीसीबी) -रविवारी सकाळी साडेसहा वाजता कात्रज देहूरोड बायपास वर पुनावळे या ठिकाणी सायकल स्वार श्री. प्रशांत कुमार यांच्या अपघाती मृत्यू प्रकरणी इंडो अथलेटिक्स सोसायटी व शहरातील तर संघटनांचे सदस्य एकत्र येऊन रावेत पोलीस स्टेशन या ठिकाणी पोलीस निरीक्षक श्री. शिवाजी गवारे सर यांना दोषीवर कडक कारवाई करण्यात यावी. त्याचे लायसन आणि गाडीs दोन्ही जप्त व्हाव्यात की जेणेकरून भविष्यामध्ये त्याच्याकडून असे कृत्य घडू नये या संदर्भात निवेदन देण्यात आले.

याप्रसंगी स्वर्गीय प्रशांत कुमार यांना आदरांजली वाहण्यात आली. सायकलिस्ट व धावपटू यांच्या सुरक्षिततेसाठी शपथ घेण्यात आली. सर्वांना मंगळवारी 30 ऑगस्ट रोजी पिंपरी चिंचवड कमिशनर ऑफिस येथे सकाळी दहा वाजता जमावे यासंदर्भात विनंती करण्यात आली. यावेळी गजानन खैरे, गणेश भुजबळ , अजित पाटील, गिरीश परदेशी, गिरीराज उमरीकर, अजित गोरे, असीम दरेकर, निलेश घोळवे , डॉ.अजय शर्मा , संदीप परदेशी, अमीर शेख , सुनील चाको, युवराज पाटील त्याचप्रमाणे इतर सदस्य देखील उपस्थित होते, याप्रसंगी इंडो अथलेटिक्स सोसायटी तर्फे लवकरच एक रस्ता सुरक्षा संदर्भात सामाजिक जागर पोलीस दलासोबत घेण्यात येईल असे आवाहन आय ए एस चे सदस्य गजानन खैरे करण्यात आले.

Share This Article