भाजपाकडून `आप` च्या खासदारांंना २० कोटींची ऑफर

1 Min Read

नवी दिल्ली, दि. २४ (पीसीबी) – ‘आप’चे राष्ट्रीय प्रवक्ते आणि राज्यसभा खासदार संजय सिंह यांनी आज पत्रकार परिषद घेत, मोदी सरकारवर जोरदार टीका केली. ”पंतप्रधान नरेंद्र मोदी हे केंद्रीय यंत्रणांचा वापरकरून आम आदमी पक्षावर दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहे. ‘आप’च्या आमदारांना फोडून भाजपाने मनीष सिसोदिया यांचा एकनाथ शिंदे करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो यशस्वी झाला नाही.”, असे ते म्हणाले.

”आमच्या आमदारांना धमकावण्याचे प्रयत्न सुरू आहे. प्रत्येक आमदारांना २०-२० कोटींची ऑफर देण्यात येत आहे. हे २० कोटी घ्या, अन्यथा मनिष सिसोदियांसारखा सीबीआय कारवाईचा सामना करा, अशी धमकी देण्यात येत आहे. ‘आप’चे आमदार अजय दत्त, संजीव झा, सोमनाथ भारती आणि कुलदीप कुमार, यांना भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) नेत्यांनी संपर्क साधला आहे, असा आरोपही संजय सिंह यांनी केला.

यासंदर्भात बोलताना सोमनाथ भारती म्हणाले ”सिसोदिया यांच्यावरील खटले खोटे आहेत हे भाजपाच्या नेत्यांना माहिती आहे. त्यांच्यावर वरिष्ठ नेत्यांचा दबाव आहे. त्यांना कोणत्याही परिस्थिती दिल्लीतील ‘आप’ सरकार पाडायचे आहे. भाजपच्या एका नेत्याने मला सांगितले की काहीही झाले तरी आम्ही दिल्ली सरकार पाडू.”

Share This Article