कारखान्यातील कच्च्या मालाची चोरी

1 Min Read

आळंदी, दि. २० (पीसीबी) – कंपनीतून चोरटयांनी एक लाख 14 हजारांचे रॉ मटेरियल चोरून नेले. ही घटना शुक्रवारी (दि. 19) सकाळी सात वाजता एस एस इंडस्ट्रीज प्रा ली, मरकळ येथे उघडकीस आली.

नवनाथ शाडू लोखंडे (वय 44, रा. मरकळ, ता. खेड) यांनी याप्रकरणी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी लोखंडे हे मरकळ येथील एस एस इंडस्ट्रीज प्रा ली या कंपनीत सुपरवायझर पदावर काम करतात. बुधवारी (दि. 17) मध्यरात्री साडेबारा ते शुक्रवारी सकाळी सात वाजताच्या कालावधीत अज्ञात चोरट्याने कंपनीत प्रवेश करून कंपनीतून एक लाख 14 हजार 198 रुपये किमतीचे रॉ मटेरियल व सामान चोरून नेले. आळंदी पोलीस तपास करीत आहेत.

Share This Article