पिस्तूल बाळगल्या प्रकरणी तरुणास अटक

bpcauthor
1 Min Read

पिंपरी दि. १७ (पीसीबी) -पिस्तूल बाळगल्या प्रकरणी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी एका तरुणाला अटक केली आहे. ही कारवाई शुक्रवारी (दि. १५) रात्री कडाचीवाडी येथे करण्यात आली.

भरत केशव पवार (वय २२, रा. झित्राईमळा, चाकण. मूळ रा. परभणी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस शिपाई राजकुमार हनुमंते यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एक तरुण कडाचीवाडी येथे बापदेव वस्तीत पिस्तूल घेऊन आला असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून भरत पवार याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे ४० हजारांचे एक पिस्तूल आढळले. त्याला पोलिसांनी अटक केली आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

Share This Article