महिलेशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करत विनयभंग

bpcauthor bpcauthor
1 Min Read

पिंपरी दि. १३ (पीसीबी) -महिलेशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करून तिच्याशी गैरवर्तन करत इच्छा विनयभंग केला.या तसेच बदनामी करण्याची धमकी दिल्याप्रकरणी एका तरुणाला अटक करण्यात आली आहे. ही घटना जून २०२१ ते ११ जुलै २०२२ या कालावधीत धावडे वस्ती भोसरी येथे घडली.

नितीन संजय गुडदे (वय २६, रा. दिघी रोड,भोसरी) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी २७ वर्षीय पीडित महिलेने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जून २०२१ या महिन्यात फिर्यादीला पाहून आरोपीने वाईट इशारे करून तिचा पाठलाग केला. तिच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. याबाबत फिर्यादी यांच्या पतीने आरोपीला समजावून सांगितले. त्यानंतरही आरोपीने फिर्यादीचा वेळोवेळी पाठलाग करून जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. ११ जुलै रोजी आरोपीने फिर्यादी यांच्या घरासमोर येऊन त्यांना वाईट इशारे करून जोरजोरात आवाज दिला. फिर्यादीला भेटण्यासाठी घराबाहेर बोलावून त्यांच्या घरात घुसण्याचा आरोपीने प्रयत्न केला. फिर्यादीने आरोपीसोबत मैत्री ठेवली नाही, त्याला भेटली नाही तर तुला सोडणार नाही, अशी धमकी दिली. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

Share This Article