क्लासला निघालेल्या शाळकरी मुलीचा मोबाईल हिसकावला

PCB Admin
1 Min Read

निगडी, दि. ७ (पीसीबी) -क्लासला निघालेल्या शाळकरी मुलीचा मोबाईल फोन अनोळखी चोरट्याने हिसकावून नेला. ही घटना बुधवारी (दि. 6) दुपारी पावणे पाच वाजता निगडी प्राधिकरण येथे घडली.

याप्रकरणी 17 वर्षीय मुलीने निगडी पोलीस ठाण्यात अनोळखी चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मुलगी अकाउंट विषयाच्या क्लाससाठी पायी चालत जात होती. रामकृष्ण मोरे कॉलेज समोर आल्यानंतर त्यांच्या मागून आलेल्या दुचाकीवरील अनोळखी चोरट्याने त्यांच्या हातातून 12 हजार रुपये किमतीचा मोबाईल फोन हिसकावून नेला. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

Share This Article