प्रवासी महिलेची सोन्याची बांगडी पळवली

1 Min Read

निगडी, दि. ६ (पीसीबी) – पीएमपीएमएल बसमध्ये चढताना प्रवासी महिलेच्या हातातील सोन्याची बांगडी चोरट्याने चोरून नेली. ही घटना टिळक चौक निगडी येथे मंगळवारी (दि. 5) दुपारी बारा वाजताच्या सुमारास घडली.याप्रकरणी महिलेने अज्ञात चोरट्याच्या विरोधात निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला मंगळवारी दुपारी बारा वाजताच्या सुमारास टिळक चौक निगडी येथून देहूगावकडे जात होत्या. त्या पीएमपीएमएल बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेऊन चोरट्याने फिर्यादीच्या हातातील एक लाख 10 हजार रुपये कितमीची अडीच तोळ्यांची सोन्याची बांगडी चोरून नेली. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

Share This Article