कामावर निघालेल्या कामगाराला लुटले

1 Min Read

चिखली, दि. ६ (पीसीबी) – कामावर पायी जात असलेल्या कामगाराला चार जणांनी रस्त्यात अडवून लुटले. ही घटना मंगळवारी (दि. 5) पहाटे तीन वाजताच्या सुमारास हरगुडे वस्ती, चिखली येथे घडली.

पोपट गोरख ताटे (वय 30, रा. नेवाळे वस्ती, चिखली) यांनी याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार चार अनोळखी इसमाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी पहाटे फिर्यादी कामावर जात होते. त्यांना आरोपींनी रस्त्यात अडवले. शिवीगाळ करून धारदार शस्त्राने व लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जखमी केले. त्यानंतर फिर्यादीच्या पॅन्टच्या खिशातून तीन हजार रुपये रोख रक्कम आणि पाच हजारांचा मोबाईल फोन काढून नेला. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

Share This Article