बेकायदेशीरपणे हुक्का पार्लर चालवल्या बाबत तिघांवर गुन्हा

PCB Admin
1 Min Read

किवळे, दि. ४ (पीसीबी) – किवळे गावात बॅचलर फॉरेस्ट अँड रेस्टो या हॉटेल मध्ये सुरु असलेल्या हुक्का पार्लरवर रावेत पोलिसांनी शनिवारी सायंकाळी कारवाई केली. बेकायदेशीरपणे हुक्का पार्लर चालवल्या प्रकरणी तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ऋषिकेश राजू कस्पटे, आत्माराम परशुराम कस्पटे (दोघे रा. वाकड), शुभम धुमाळ (रा. किवळे गाव, ता. हवेली) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस कर्मचारी संतोष कोळगे यांनी रावेत चौकीत फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किवळे गावात असलेल्या बॅचलर फॉरेस्ट अँड रेस्ट या हॉटेल मध्ये आरोपी ऋषिकेश आणि आत्माराम यांनी विनापरवाना हुक्का पार्लर चालवले. याबाबत माहिती मिळाली असता रावेत पोलिसांनी त्यावर कारवाई केली. दरम्यान पोलिसांची चाहूल लागताच हॉटेल चालक आणि तिथे बसलेले नागरिक अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले. या धंद्यासाठी शुभम धुमाळ याने जागा उपलब्ध करून दिल्याने त्याच्या विरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत पोलिसांनी सात हजार 700 रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. रावेत पोलीस तपास करीत आहेत.

Share This Article