100 फ्लैट पुढील हौसिंग सोसायट्या मधून कोविड लसीकरण – मोशी फेडरेशनची मागणी मान्य

0
556

मोशी,दि.२८(पीसीबी) – पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त राजेश पाटील यांनी फेडरेशनच्या विनंतीचा मान ठेवून आपल्या सर्व 100 पेक्षा जास्त फ्लॅट असणाऱ्या सोसायट्यांमध्ये 45 वर्षाच्या पुढील सदस्यांना कोव्हीड-19 ची लस देण्यासाठी , कोव्हीड-19 लसीकरणाचे कँप लावण्याचे मान्य करून, pcmc च्या वैधकीय विभागाला आदेश काढण्याचे मान्य केले आहे.

 

एप्रिल 2021 पासून आपल्या सर्व सोसायट्यामध्ये कोव्हीड लसीकरण करण्यासाठी कँप लावण्यात येणार आहेत , तरी 45 वर्ष वयाच्या पुढील सदस्यांनी आपल्या सोसायटीमध्ये हे शिबीर लागल्यावर ही लस घ्यावी ही विनंती फेडरेशनच्या वतीने नागरिकांना करण्यात आली आहे.