२३ मे नंतर बारामतीला विजयोत्सव साजरा करण्यासाठी जाणार – चंद्रकांत पाटील

0
524

सोलापूर, दि. ११ (पीसीबी) – शरद पवार यांना  राज्यातील दुष्काळी भागात सुरू असलेल्या  छावण्या व टँकर  शरद पवारांना  दिसत नाहीत,  हा संशोधनाचा विषय आहे. येत्या  २३ मे नंतर मी बारामतीला विजयोत्सव साजरा करण्यासाठी  जाणार आहे. त्यावेळी त्यांना हे सांगेल, असे   महसूल मंत्री चंद्रकांत पाटील   आज (शनिवार) येथे म्हणाले.

दुष्काळी दौऱ्यानिमित्त  दक्षिण मंगळवेढा  भागातील भोसे (ता. मंगळवेढा) येथे मंत्री पाटील यांनी  शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी पाटील बोलत होते.

दुष्काळी  भागात सरकारने   जनावरांच्या छावण्यात चारा व पाण्याची उत्तम सोय  केली आहे. अतिशय चांगली व्यवस्था ठेवण्यात आली असतानादेखील शरद पवारांसारखे नेते महाराष्ट्रात छावण्या नाहीत, टँकर नाहीत, असे म्हणत आहेत. येत्या २३ मे नंतर बारामतीला विजयोत्सव  साजरा करण्यासाठी मी बारामतीला  जाणार आहे, त्यावेळी त्यांना मी हे सांगेल, असे पाटील म्हणाले.