हॉटेल सोमवार पासून खुली,पण ज्येष्टांना प्रवेशबंदी आणि…

0
312

मुंबई, दि. 3 (पीसीबी) : राज्यातील हाॅटेल, रेस्टाॅरंटस येत्या पाच आॅक्टोबरपासून सुरू होत आहेत. ही हाॅटेल सुरू करताना कोरोनाचा प्रसार होणार नाही, यासाठी काही नियम व अटी हाॅटेलचालकांसाठी लागू करण्यात आलेल्या आहेत. त्यानुसार मास्कची सक्ती, ग्राहकांचे तापमान मोजणे, ज्येष्ठ नागरिकांना प्रवेशबंदी, हॅंड सॅनिटायझरचा सातत्याने वापर आदी अटी घालण्यात आलेल्या आहेत. एकूण बैठक क्षमतेच्या 50 टक्केच वापर करण्याची सूचना देण्यात आली आहे.
 
राज्याच्या पर्यटने विभागाने जारी केलेल्या प्रमुख अटी पुढीलप्रमाणे

  • येणारया सर्व ग्राहकाचे तापमान तपासण्यात येईल. कोविड लक्षणे दिसल्यास त्यांना प्रवेश दिला जाणार नाही.
  • वयोवृद्ध नागरिकांना प्रवेश दिला जाणार नाही.
  • संपूर्ण हाॅटेलमध्ये सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे लागेल. त्यानुसार ग्राहकांच्या बसण्याची सोय करावी लागेल. 
  • शरीराचे तापमान 100.4 अंशापेक्षा जास्त असणाऱ्यांना हॉटेलमध्ये प्रवेश नसेल.
  • हँड सॅनिटाझरचा वापर सतत करावा लागेल. ग्राहकांसाठी ते सहज उपलब्ध असेल.
  • ग्राहकांनी शक्यतो डिजिटल कॅश पेमेंटचा वापर करावा.
  • ग्राहकांना मास्क बंधनकारक असेल.
  • ग्राहकांनी बसताना सोशल डिस्टन्स पाळावे
  • दोन टेबलमध्ये किमान एक मीटरचे अंतर हवे
  • बफे पद्धतीने जेवणाची परवानगी नाही
  • शिजवलेले अन्नपदार्थच देण्याची शिफारस. कच्चे किंवा थंड पदार्थ सॅलडसारखे शक्यतो देऊ नयेत. 
  • हॉटेलचे  cctv सुरू असणे  बंधनकारक
  • दोन टेबलमध्ये किमान एक मीटरचे अंतर हवे.
  • हाॅटेलमध्ये वारंवार सॅनिटायझेशन व स्वच्छता करण्यात यावी
  • सर्व कर्मचाऱ्यांना मास्क असणे आवश्यक
  • अन्नपदार्थ गरम राहण्यासाठी वार्मरचा वापर करण्यात यावा
  • क्रोकरी, कटलरी व इतर साहित्य हे गरम पाण्याने स्वच्छ करण्यात यावे
  • प्री-प्लेटेड (तयार थाळी) डिश देण्याचा शक्यतो प्रयत्न करावा.
  • अन्नपदार्थ वाढण्यासाठी विशिष्ट कर्मचारीच विशिष्ट टेबलवर सेवा
    देण्यासाठी ठेवावेत.
  • हाॅटेलमधील इतर साहित्य स्वतंत्रपणे सॅनिटाईस करून ठेवावे