हे वारकरी परिषद वाले कोण आहेत ह्याची ओळख द्यायला नको; जितेंद्र आव्हाडांचे वारकरी परिषदेला प्रत्युत्तर

0
912

मुंबई,दि.४(पीसीबी) – राष्ट्रीय वारकरी परिषदेनं राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे देवाला मानत नाही. त्यांनी समर्थ रामदास यांचा एकेरी उल्लेख केला होता. त्यामुळे पवारांना धार्मिक कार्यक्रमांना बोलावू नका, असं पत्रक काढलं आहे. यावरून राष्ट्रवादीचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी वारकरी परिषदेवर निशाणा साधला आहे.

जितेंद्र आव्हाड यांनी वारकरी प्रथा परंपरा सुरु झाली ती इथल्या कर्म कांडा विरुद्ध पांडुरंग भक्ती मध्ये तल्लीन झालेले संत याचेच प्रबोधन करत होते. कट्टर मनुवादी त्याला विरोध हे वारकरी परिषद वाले कोण आहेत?, याची ओळख द्यायला नको, असं म्हटलं आहे.

हिंदू धर्मसाठी कार्य करणाऱ्या राज्यकर्त्यांनाच धार्मिक कार्यासाठी बोलवावे पैशाच्या लालसेपोटी जरी अशा मंडळींना कोणी बोलवत असेल, तरी तो अधर्मच म्हणायचा, असंही पत्रकात म्हटलं आहे.

दरम्यान, शरद पवार हे रामायणाची आवश्यकता नाही, असं म्हणतात. मुख्यमंत्री असताना पांडुरंगाच्या महापूजेला गैरहजर राहतात. समर्थ रामदास स्वामींचा एकेरी उल्लेख करतात. संत ज्ञानेश्वरांनी समाधी घेतली नाही असं पुस्तक-लेख लिहिणाऱ्या तथाकथित पुरोगामी संघटनांना त्यांचा सातत्याने पाठिंबा असतो, असं पत्रक राष्ट्रीय वारकरी परिषदेन काढलं आहे.