हे फायदे वाचून तुम्ही ‘बीट’ खायला नक्की सुरुवात कराल.. ‘बीट’ खाण्याचे हे आहेत आरोग्यदायी फायदे

0
744
Beetroot Juice

रोजच्या आहारात बीट खाण्याचे अनेक असे गुणकारी फायदे आहेत जे तुमच्यापैकी काहीच जणांना माहिती असतीलही परंतु जास्तीत जास्त लोकांना याबद्दल फारसे असे माहिती नाहीये. म्हणूनच आजच्या या लेखात आम्ही तुम्हाला बीट खाण्याचे फायदे सांगणार आहोत. जे नक्कीच तुम्हाला तुमचे जीवन आरोग्यदायी बनवण्यासाठी मदत करतील….

१) बीट खाल्यामुळे उच्चदाब नियंत्रित राहतो त्यामुळे आपल्याला हार्ट अटॅक ह्या गोष्टी होत नाहीत . गाजर आणि बीट यांचा रस एक ग्लास पिला तर याचा मोठा फायदा आहे .ब्लड प्रेशर नियंत्रित राहते . ब्लड प्रेशर असणाऱ्या व्यक्तींना बीट नेहमी खायला द्यावं .

२) शरीरात रक्ताचे प्रमाण जर कमी असेल तर ते भरुन काढण्यासाठी रोज एक कप बीटचा रस पिल्याने मोठा फायदा होतो . त्याचबरोबर दुसरा फायदा किडणी स्टोन असेल तर ती समस्या दूर होते . रोज ३० ग्रॅम बीट खाल्याने किडणी स्टोन त्याचबरोबर लिव्हर वर आलेली सूज ही कमी येते .

३) त्याचबरोबर महत्त्वाचा फायदा म्हणजे कप पूर्णपणे दूर होतो. कपाची समस्या दूर होते. बीट श्वसननलिका स्वच्छ ठेवते. बीट कॅल्शियम ची पुर्तता करते . कॅल्शियम शरीरासाठी महत्त्वाचे आहे .त्यामुळे आपली हाडे, दात मजबूत होतात.बीट कॅल्शियम कमतरता दूर करते. मुलांनी आणि युवकांनी बीट चावून
खाल्ले पाहिजे त्यामुळे दात , हिरड्या मजबूत होतात .

४) बीटाच्या रसामध्ये मध घालून जर लावले तर खाज पूर्णपणे बरी होते . त्याचबरोबर सांधेदुखी पूर्णपणे थांबते. सांधेदुखी बारी होते करण बीटमध्ये सोडियम, कॅल्शियम , सलफर ,पोटयाशीयम ,आयोडिन, आयर्न, विटामिन B, B२ आणि मोठ्या प्रमाणात क जीवनसत्व आहेत .

५) गॅस ची समस्या जर असेल तर दोन चमचे बिट आणि मध खाल्याने गॅसची समस्या दूर होते. बिटामध्ये मोठया प्रमाणात फायबर आसल्याने पोटाची समस्या दूर होते. बीट रोज खाल्ल्याने पोटाच्या समस्या दूर होतात.

६. सर्वांनाच गोरा चेहरा आवडतो. गोरं होण्यासाठी बीट चे पीस कट करून मिक्सर मध्ये बारिक करुन पेस्ट करा .पेस्ट चेहऱ्यावरती १५-२० मिनिट लावून धुवावे . हा प्रयोग आठवड्यातून २-३ वेळा करू शकता. तसेच रोज ही करू शकतो. यामूळे त्वचा चमकदार होते.

७) चेहऱ्यावर जर सुरकुत्या येत असतील तर एक ग्लास बिट चा रस पिल्याने सुरकुत्या जातात . त्यामुळे त्वचा टाईट होते .

८) बीट चे काप करून पेस्ट करून घ्या. व त्यानंतर फ्रिजरमध्ये बर्फ होण्यासाठी ठेवा. बर्फ तयार झाल्यावर रोज मसाज करा . बर्फ लावल्यामुळे जे ओपन
पोल्स आहेत , ते क्लोज होतात . डार्क स्पॉट निघून जातात. यामुळे चेहऱ्यावर ग्लो येतो .

९) सगळ्यांनाच पिंक कलर चे ओठ आवडतात त्यासाठी वेगवेगळ्या लिपस्टिक वापरतो . पण लिपस्टिक मध्ये केमिकल येते. लीपबम तयार करण्यासाठी
बिट खिसून घ्या . व नंतर रस काढा . रासामध्ये आर्धा चमचा खोबरेल तेल घाला . एक चमचा व्यासलीन घ्या. व ते मिक्स करा लीपबम तयार!

हे होते बीट खाण्याचे काही आरोग्यदायी फायदे हे वाचून तुम्ही नक्कीच बीट खायला सुरवात कराल. तुम्हाला जर हा लेख आवडला असेल तर नक्की शेअर करा.