“हेलिकॉप्टर घ्यायचंय तेही कष्टाच्या पैशातून”

0
334

मुंबई,दि.६(पीसीबी) – औरंगाबादमध्ये एका दैनिकाला दिलेल्या मुलाखतीमध्ये राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी “स्वता:च्या कष्टाच्या पैशातून आता हेलिकॉप्टर घ्यायचं आहे” अशी इच्छा व्यक्त केली आहे.

रोहित पवार म्हणाले, अनेकांना बाऊन्सर ठेवायला आवडतं. मला तसं काही पटत नाही. अनेक जण शहर मागे पडलं की गाड्या बदलतात. असं एकीकडे एक आणि दुसरीकडे दुसरं वागणं जमत नाही, असं पवारांनी सांगितलं आहे.

रोहित पवार हे अनेक प्रकारच्या कार आणि दुचाक्यांचे धनी आहेत. आवडेली गाडी ते खरेदी करतातच. मात्र आता त्यांना गाडी नाही तर हेलिकॉप्टर घ्यायचं असल्याचं रोहित पवारांनी एका मुलाखतीत म्हटलंय. यावेळी त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं.