ही सत्ता शिवसेनेची नाहीतर, ही सत्ता राष्ट्रवादीची – नारायण राणे

0
534

मुंबई,दि.५(पीसीबी) – माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी “सरकार स्थापन करून महिनाभरापेक्षा जास्त काळ लोटला आहे. मंत्रालयात दालने घेतली आणि बंगले घेतले परंतु कारभार सुरू नाही. जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न होत नाहीत” अशी टीका महाविकासआघाडीवर केली आहे.

नारायण राणे यांनी “तीन पक्ष एकत्र येणं हे गणितच चुकलं आहे. या प्रत्येक पक्षाची ध्येय धोरणं वेगळी आहेत. हे तिन्ही पक्ष जनतेसाठी नाहीतर सत्तेसाठी एकत्र आले आहेत. तसेच ही शिवसेनेची सत्ता नाहीतर ही राष्ट्रवादीची सत्ता आहे” असं म्हणत सरकारवर निशाणा साधला आहे.

राजीनामा देण्याची सुरूवात खातेवाटपा अगोदरच झाली होती. हे सरकार अल्पकालावधीचं असुन ते दोन महिने देखील टिकेल की नाही याबाबत शंका आहे, असं नारायण राणे यांनी म्हटलं आहे. सरकारमध्ये जे मुख्यमंत्री आहेत, त्यांना एक टक्का देखील महाराष्ट्राच्या प्रशासनाचा अभ्यास नाही. त्यांचा कोणताही वचक नाही, असा टोला नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला आहे.