हिजाब नंतर बायबलचा वाद …

0
428

बेंगळुरु, दि. २६ (पीसीबी) – आपल्या देशात सर्वधर्म समभाव असला तरीही काही समाजकंटक धर्माच्या नावावर समाजात तेढ निर्माण करण्याचा सतत प्रयत्न करत असतात. कर्नाटकातही आता बायबलवरून वाद सुरु झालाय. याआधी हिजाबवरून वाद निर्माण झाला होता आणि त्यामुळं देशातलं वातावरण ढवळून निघालं होतं हे आपल्याला माहिती आहे. बंगळुरुतील क्लेरेन्स हायस्कूलच्या व्यवस्थापनानं बायबलसंबंधी एक आदेश काढलाय. शाळेत मुलांनी बायबल ग्रंथ आणणं बंधनकारक आहे, असा नवा आदेश आता देण्यात आलाय. त्यामुळं हिंदू संघटनांनी आता याचा विरोध करायला सुरूवात केलीय. याच पार्श्वभूमीवर कर्नाटकचे शिक्षणमंत्री बी. सी. नागेश यांनी शाळा व्यवस्थापनाला इशारा दिलाय.

शिक्षणमंत्री नागेश म्हणाले, शाळेमध्ये धार्मिकतेची जनजागृती केली जात असेल तर, अशा शाळांवर सरकार कडक कारवाई करेल. शाळेनं बायबलबाबतचा जो काही निर्णय घेतलाय, तो पूर्णपणे चुकीचा आहे. तो नियमांच्या विरुद्ध आहे. कोणत्याही शाळेत धार्मिक पुस्तकं किंवा प्रथा शिकवण्यावर बंदी आहे. मात्र, असं असताना शाळेनं विद्यार्थ्यांना बायबल सोबत घेऊन जाण्याची सक्ती का केली, हे मलाही कळत नाहीय. परंतु, अशा शाळांवर सरकार कडक कारवाई करेल, असा इशारा त्यांनी दिलाय.