हिंजवडी पोलिसांची धडक कारवाई; कल्याण जुगार चालवणा-या ‘त्या’ दोघांना अखेर अटक

0
261

हिंजवडी, दि. २३ (पीसीबी) – कल्याण नावाचा जुगार चालवणा-या दोघांवर हिंजवडी पोलिसांनी महाराष्ट्र जुगार प्रतिबंध कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. त्यातील एकाला पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई सोमवारी (दि. 22) दुपारी कासारसाई साखर कारखान्याच्या जवळ करण्यात आली.

सोमनाथ बबनराव मोहिते (वय 33, रा. कासारसाई, ता. मुळशी. मूळ रा. बीड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्यासह कांचन काळे (रा. जळगाव) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलीस शिपाई झनकसिंग गुमलाडू यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सोमनाथ आणि त्याचा मालक आरोपी कांचन काळे स्वतःच्या फायद्यासाठी बेकायदेशीरपणे मोबाईलवर लोकांकडून जुगाराचे आकडे घेत होते. त्याद्वारे आरोपी कल्याण नावाचा जुगार चालवीत होते. याबाबत हिंजवडी पोलिसांना माहिती मिळाल्यावर पोलिसांनी सोमनाथ याच्यावर कारवाई करून त्याला जुगाराच्या साहित्यासह अटक केली. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.