हिंजवडी मेट्रो साईट वरून सामान चोरणाऱ्या दोघांना अटक

0
469

हिंजवडी, दि. १७ जुलै (पीसीबी) – हिंजवडी येथे सुरू असलेल्या टाटा मेट्रो येथील साइटवरून दोघांनी 50 किलो वजनाचे साहित्य चोरले. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना बेड्या ठोकल्या आहेत. ही चोरी रविवारी(दि.16) दुपारी घोटावडे फाटा येथील साइटवर घडली.

याप्रकरणी श्रीकृष्ण विठ्ठल माळी (वय 31 रा.काळेवाडी)यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती . त्यानुसार पोलिसांनी महेश संदीप कांबळे (वय 26) व राहुल उल्हास पारखे (वय 43) दोघे राहणार माण. या दोघांना अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे हिंजवडी साइटवर सुरक्षारक्षक सुपरवायझर म्हणून काम करतात. यावेळी आरोपींनी दुचाकीवरून येऊन साइटवरील दोन स्टीलचे व दोन सी टाईप रॉड असे 50 किलो वजनाचे साहित्य चोरून नेले होते. पोलिसांनी दुचाकी क्रमांक वरुन आरोपींचा शोध लावत त्यांना अटक केली आहे. हिंजवडी पोलीस ठाण्यात दोघांविरूद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.