हिंजवडीत दुचाकीस्वार चोरट्यांनी तरुणाला लुटले

0
660

चिंचवड, दि. २६ (पीसीबी) – दुचाकीवरुन आलेल्या दोघा चोरट्यांनी एका तरुणाला पकडले. त्यानंतर त्याला मारहाण करुन त्याचे तोंड दाबले आणि त्याच्याजवळील ५ हजारांचा मोबाईल आणि ५ हजार ७०० रुपयांची रोख असा एकूण १० हजार ७०० रुपयांचा ऐवज जबरदस्ती चोरुन नेला. ही घटना बुधवारी (दि.२४) पहाटे दिडच्या सुमारास भुमकर चौकाकडून शनिमंदीराकडे जाणाऱ्या सर्व्हिस रोडवर घडली.

याप्रकरणी हनुमंत महादेव खोत (वय २८, रा. शरायु टोयोटा कंपनीचे हॉस्टेल, सर्व्हे क्र. १४०/२, लिंक रोड अशोकनगर पवारवस्ती ताथवडे) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोन अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी पहाटे दिडच्या सुमारास फिर्यादी हनुमंत खोत हे हिंजवडीतील भुमकर चौकाकडून शनिमंदीराकडे जाणाऱ्या सर्व्हिस रोडवरुन जात होते. यावेळी दुचाकीवरुन आलेल्या दोघा चोरट्यांनी हनुमंत यांना आढवले. तसेच त्यांना मारहाण करुन त्यांचे तोंड दाबले आणि त्याच्याजवळील ५ हजारांचा मोबाईल आणि ५ हजार ७०० रुपयांची रोख असा एकूण १० हजार ७०० रुपयांचा ऐवज जबरदस्ती चोरुन नेला. पोलीस उपनिरीक्षक ए.बी.हिंगोले तपास करत आहेत.