हिंजवडीतील तरुणीचे अश्लिल फोटो तरुणाने केले व्हायरल; गुन्हा दाखल

0
1076

हिंजवडी, दि. ३० (पीसीबी) –  इन्स्टाग्रामवर तरूणीचे बनावट अकाऊंट तयार करुन एका तरुणाने त्या व्दारे तिचे अश्लिल फोटो पोस्ट करुन बदनामी केल्याची धक्कदायक घटना समोर आली आहे. ही घटना बुधवार (दि.२३) घडली.

याप्रकरणी पिडित तरुणीने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अनिकेत चंद्रशेखर मेश्राम (रा. श्रीनगर, गोंदिया) या तरुणा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी (दि.२३ जानेवारी) रोजी आरोपी मेश्राम याने पीडित तरुणीचे इन्स्टाग्राम या सोशल साइटवर बनावट अकाउंट तयार केले. इलेक्ट्रॉनिक माध्यमांचा वापर करत त्या तरुणीचे अश्लिल फोटो तयार केले. ते फोटो सोशल मीडियावर व्हायरल करीत तरुणीची बदनामी आणि विनयभंग करत तिला धमकी दिली. याप्रकरणी पिडितेने अनिकेत विरोधात हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलिस उपनिरीक्षक हिंगोले अधिक तपास करत आहेत.