हाथरस प्रकऱणात काँग्रेस आक्रमक, राहुल गांधी यांना पोलिसांची धककाबुक्की

0
247

हाथरस (उत्तर प्रदेश), दि. १ (पीसीबी) : हाथरसला पायी चालत जाणाऱ्या काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना उत्तर प्रदेश पोलिसांकडून धक्काबुक्की करण्यात आली. यावेळी राहुल गांधी जमिनीवर पडले. यासोबतच काँग्रेस कार्यकर्त्यांवरही पोलिसांनी लाठीमार केला. मात्र हाथरसला जाऊन पीडितेच्या कुटुंबांची भेट घेण्यावर राहुल गांधी ठाम आहेत. या प्रकाराने मोठा गोंधळ उडाला. कार्यकर्त्यांन उत्तरप्रदेश पोलिसांच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. देशभर या घटनेचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे.

 

 

हाथरस बलात्कार आणि हत्या प्रकरणातील पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी राहुल गांधी आणि काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी दिल्लीवरुन हाथरसला रवाना झाले. मात्र त्यांचा ताफा पोलिसांनी अडवला. त्यानंतर राहुल आणि प्रियंका यमुना एक्स्प्रेस वेवरुन हाथरसला पायी जाण्याचा निर्णय घेतला. मात्र एका ठिकाणी पोलिसांनी राहुल गांधी यांना रोखण्याचा प्रयत्न केला. यावेळी ” ये देखो आज का हिंदुस्तान,” असं राहुल गांधी बोलत होते. त्याचवेळी पोलिसांकडून त्यांना धक्काबुक्की झाली. त्यानंतर राहुल गांधी रस्त्याच्या कडेला पडले. यानंतर उठून ते पुन्हा चालू लागले.