‘स्वरांजली’च्या माध्यमातून सोमवारी निगडीत लतादीदींना श्रद्धांजली

0
396

नगरसेवक अमित राजेंद्र गावडे व प्राधिकरण ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने श्रद्धांजली मैफलीचे आयोजन

निगडी, दि. १६ (पीसीबी) – ‘स्वरांजली’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून गानसरस्वती, भारतरत्न लता मंगेशकर यांना सुमनांजली अर्पण करण्यात येणार आहे. नगरसेवक अमित राजेंद्र गावडे आणि प्राधिकरण ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने या संगीत श्रद्धांजली मैफलीचे आयोजन करण्यात आले.

निगडी प्राधिकरणातील, सेक्टर 27 अ नियोजित महापौर निवास मैदान येथे रविवारी (दि.20) सायंकाळी सहा वाजता हा कार्यक्रम होणार आहे. जितेंद्र भुरुक प्रस्तुत भव्य वाद्यवृंदचे कलाकार लतादीदींना त्यांनी गायलेल्या गीतांची उजळणी करीत आदरांजली वाहणार आहेत.

मिस्तु बर्धन, जितेंद्र भुरुक हे लता मंगेशकर यांनी गायलेली गाणी, गाजलेली हिंदी गाणी, प्रार्थना, देशभक्तीपर गीतांची झलक सादर करणार आहेत. या माध्यमातून लतादीदींच्या चिरंतन स्मृतींना उजाळा देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. परिसरातील नागरिकांनी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन आयोजक नगरसेवक अमित राजेंद्र गावडे, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष सुहास जोशी यांनी केले.