“स्वप्निलने आत्महत्या केली. तो जगला काय? मेला काय? सरकारला पाझर फुटणार आहे की नाही?”

0
228

मुंबई, दि.०५ (पीसीबी) : आज विधिमंडळाच्या कामकाजाला सुरुवात झाली आणि विरोधकांनी सुरुवातीलाच एमपीएससी आणि स्वप्निल लोणकरच्या आत्महत्येवरुन सरकारवर आगपाखड करत त्यांना चांगलाच धारेवर धरलं. दरम्यान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले कि, “सगळं कामकाज बाजूला ठेवा पण MPSC वर चर्चा व्हायलाच हवी. कारण आज राज्यातल्या लाखो विद्यार्थ्यांच्या, युवकांच्या मनातील हा प्रश्न आहे. एमपीएससी आपल्या पावलाने चालतीय, तिला एका स्वप्निलने आत्महत्या केली काय, जगला काय आणि मेला काय… काहीही फरक पडत नाही…. एमपीएससीला स्वायत्तता दिली आहे म्हणजे स्वैराचार नाही.. “.

पुढे फडणवीस असंही म्हणाले कि, “स्वप्नील लोणकरच्या आत्महत्येचे पडसाद आज विधिमंडळात उमटलेले पाहायला मिळाले. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आक्रमक भूमिका घेत सरकार एमपीएससीवर काय पावलं उचलणार आहे, हे जाहीर करावं, असं आव्हान दिलं. तसंच सुरुवातीलाच स्वप्निल लोणकरची सुसाईड नोट फडणवीसांनी सभागृहात वाचून दाखवली. ही सुसाईट नोट अतिशय संवेदनशील आहे. कोणाच्याही हृदयाला पाझर फुटेल असं हे पत्र आहे. सरकारला पाझर फुटणार आहे की नाही?, असं विचारत एमपीएससीवर त्वरित चर्चा घ्यावी.”

एमपीएससीला स्वायत्तता दिली आहे. परंतु स्वायत्तता म्हणजे स्वैराचार नाही… दीड दोन वर्ष परीक्षा होत नाहीयेत… मुलाखती होत नाहीत… मुलाखती झाल्या तर नियुक्त्या नाहीत… असे अनेक विद्यार्थी निराशेच्या गर्तेत सापडलेले आहेत.. एमपीएससी बोर्डावर लोक नाहीयेत… सरकार पावले उचलायला तयार नाहीये… सरकार विद्यार्थ्यांच्या व्यथा ऐकायला तयार नाहीये, असा हल्लाबोल फडणवीसांनी सरकारवर केला. आणखी किती स्वप्नील लोणकरने आत्महत्या करायला पाहिजे म्हणजे सरकारला जाग येईल, असा खडा सवाल देखील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात सरकारला विचारला.

एमपीएससीची कार्यपद्धती नव्याने ठरविण्याची आवश्यकता आहे, असंही फडणवीस म्हणाले. एमपीएससी च्या परीक्षेचा ,वेळा निकालाच्या वेळा स्ट्रिकली ठरवण्याची गरज निर्माण झाली असल्याचं देखील फडणवीस यांनी नमूद केलं. एमपीएससी संदर्भात राज्यभरात अनेक आंदोलने झाली त्यानंतर सरकारने काय केलं आणि आता सरकार काय करणार आहे याचं उत्तर सरकारने दिलं पाहिजे, असं फडणवीस म्हणाले.