स्पा सेंटरच्या नावाखाली तृतीयपंथ्याकडून करून घेतला जात होता वेश्या व्यवसाय, पोलिसांनी मारला छापा आणि…

0
422

काळभोरनगर, दि. 5 (पीसीबी): स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय चालवून महिला आणि तृतीयपंथ्याकडून वेश्या व्यवसाय करून घेणा-या एकाला अटक करण्यात आली आहे. सामाजिक सुरक्षा पथकाने एका स्पा सेंटरवर छापा मारून गुरुवारी (दि. 4) सायंकाळी ही कारवाई केली आहे.

दर्पण दिलीप कुमार (वय 32, रा. काळेवाडी. मूळ रा. बिहार) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्यासह एका महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश वाघमारे यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जुना पुणे-मुंबई महामार्गावर काळभोर नगर येथे काव्यांजली स्पा सेंटर आहे. त्यात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय सुरु असल्याची माहिती पिंपरी-चिंचवड सामाजिक सुरक्षा पथकाला मिळाली. त्यानुसार पथकाने खातरजमा करून स्पा सेंटरवर छापा मारला असता तिथे वेश्या व्यवसाय सुरु असल्याचे आढळून आले.

पोलिसांनी एका महिला आणि एका तृतीयपंथ्याची सुटका केली. आरोपी दर्पण आणि एका महिला हे दोघेजण मिळून सुटका केलेली महिला आणि तृतीयपंथ्याला जबरदस्तीने वेश्याव्यवसायाकरिता प्राप्त करून त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करून घेत असल्याचे निष्पन्न झाले आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.