सोमवारी पिंपरीत सर्व पक्षीय आणि सर्व कामगार संघटनांचे आंदोलन….. डॉ. कैलास कदम 

0
264

पिंपरी, दि.12 (पीसीबी)दिल्ली  येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनास पाठींबा देण्यासाठी तसेच पिंपरी चिंचवड मनपाच्या सर्वसाधारण सभेत शेतकरी आंदोलनाबाबत निषेधार्थ वक्तव्य  करणाऱ्या उपमहापौर केशव घोळवे यांचा निषेध करण्यासाठी शहरातील सर्व पक्षीय पदाधिकारी व कामगार संघटना संयुक्त कृती समितिच्या वतीने आंदोलन करण्यात येणार आहे अशी माहिती सर्व पक्षीय पदाधिकारी व कामगार संघटना संयुक्त कृती  समितीचे अध्यक्ष  डॉ. कैलास कदम यांनी प्रसिद्धीस दिली आहे. 

शनिवारी 12 डिसेंबर आकुर्डी येथील श्रमशक्ती भवन येथे सर्व पक्षीय पदाधिकारी व कामगार संघटना संयुक्त कृती समितिची बैठक घेण्यात आली. यावेळी समितीचे समन्वयक जेष्ठ नेते मानाव कांबळे जेष्ठ कामगार नेते अजित अभ्यंकर,  दिलीप पवार, शिवसेनेचे शहर प्रमुख योगेश बाबर, तसेच माजी नगरसेवक मारुती भापकर, कामगार नेते इरफान सय्यद, अनिल रोहम, संजय गायखे, नरेंद्र सोनवणे, गिरीश वाघमारे, जनार्धन पोलकडे, काशिनाथ नखाते , रोमी संधू, सचिन देसाइ, गणेश दराडे, प्रदीप पवार , विशार जाधव , प्रविण जाधव, धनाजी येळकर आदी उपस्थित होते. 

समितीचे समन्वयक मानव कांबळे यांनी सांगितले की, सोमवारी 14 डिसेंबरला सकाळी 10 वाजता आकुर्डी येथील तहसील कार्यालयासमोर निदर्शने करून तहसिलदारांना निवेदन देण्यात येणार आहे. तसेच दुपारी 1 वाजता पिंपरी चिंचवड मनपासमोर उपमहापौर घोळवे यांचा निषेध करून महापौरांना निवेदन देण्यात येणार आहे. 
   या आंदोलनात कोविड विषयक शासनाने सांगितलेल्या नियमांचे पालन करून सहभागी व्हावे असे आवाहन माजी नगरसेवक मारूती भापकर यांनी केले आहे.