सोन्याच्या बिस्किटाचे आमिष दाखवून मंगळसूत्र चोरले..

0
350

पिंपरी दि, १५(पीसीबी):एका महिलेला सोन्याच्या बिस्कीटाचे आमिष दाखवून दोन चोरट्यांनी तिच्या गळ्यातील 75 हजारांचे मंगळसूत्र चोरून नेले. ही घटना आळंदी रोड, भोसरी येथे मंगळवारी (दि. 14) सकाळी घडली.

मालन गोपीनाथ जाधवर (वय 57, रा. धायरकरवाडी, डुडुळगाव) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दोन अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मालन या कामानिमित्त मंगळवारी सकाळी साडनेऊ वाजताच्या सुमारास आळंदीरोड, भोसरी येथे आल्या होत्या. त्यावेळी दोन अज्ञात चोरट्यांनी मालन यांना सोन्याच्या बिस्कीटाचे आमिष दाखवले. आरोपींनी मालन यांच्या गळ्यातील 75 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे मंगळसूत्र चोरून नेले. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.