सेवानिवृत्तांनी आनंद घ्यावा आणि आपल्या जीवनाची पुढील वाटचाल आरोग्य सांभाळून करा – उप आयुक्त मिनीनाथ दंडवते

0
81

पिंपरी, दि. ३१ (पीसीबी) :- सेवानिवृत्ती ही तुमच्या आयुष्यातील नव्या अध्यायाची सुरूवात आहे. तुम्ही आयुष्यभर केलेल्या परिश्रमाचे फळ आता उपभोगण्याची वेळ आलेली आहे. अनेक वर्षांच्या कामाच्या धावपळीतून आज अनेकांना सुखाचा विसावा मिळणार असून त्याचा सेवानिवृत्तांनी आनंद घ्यावा आणि आपल्या जीवनाची पुढील वाटचाल आरोग्य सांभाळून करावी, असे प्रतिपादन उप आयुक्त मिनीनाथ दंडवते यांनी केले.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने माहे जानेवारी २०२४ अखेर नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होणा-या २४ आणि स्वेच्छानिवृत्त ३ अशा २७ कर्मचाऱ्यांचा सत्कार उपआयुक्त मिनीनाथ दंडवते यांच्या हस्ते पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीमधील दिवंगत मधुकरराव पवळे सभागृह येथे करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते.

या कार्यक्रमास विशेष अधिकारी किरण गायकवाड,मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, कामगार कल्याण अधिकारी प्रमोद जगताप, कर्मचारी महासंघाच्या चारुशीला जोशी,उमेश बांदल,बालाजी अय्यंगार, नथा माथेरे तसेच कर्मचारी व सेवानिवृत्त कर्मचा-यांचे नातेवाईक उपस्थित होते.

माहे जानेवारी २०२४ मध्ये नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये कार्यकारी अभियंता हनुमंत शिंदे, जेष्ठ वैद्यकीय अधिकारी डाॅ.सुनिता इंजिनियर, कार्यालय अधिक्षक अरुणकुमार सोनकुसरे, मुख्याध्यापिका भारती कानडे, अर्चना चव्हाण, अरुणा हिंगमिरे, उपलेखापाल हेमंत सोनावले, मुख्य लिपिक सुनिल वायदंडे, सुरज पाटकर, दत्तात्रय बरकडे, उपशिक्षिका रत्नप्रभा दौंडकर, रजनी लिंगे, प्रतिभा ननावरे, उपशिक्षक शामराव निकम, इलेक्ट्रीक मोटार पंप ऑपरेटर आनंदप्रकाश यादव, सहाय्यक उद्यान निरिक्षक दयानंद चव्हाण, वाहन चालक दिनकर काळे, रखवालदार अंबादास बारटक्के, व्यायामशाळा मदतनीस मलकू पाटील, मजूर रमेश यादव, बाळू ओझरकर, सुनिल चिंचोलिकर, कचराकुली अशोक घोडेस्वार यांचा समावेश आहे.

तर उपशिक्षिका सुरेखा कुंजीर, मजूर बाळू काळे, सफाई कामगार गीतेश्री गुजर यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांनी तर आभार कामगार कल्याण अधिकारी प्रमोद जगताप यांनी मानले.