सेंट्रींगचे काम करणाऱ्या कामगाराचा चौथ्या मजल्यावरून पडून मृत्यू

0
200

निगडी, दि. १४ (पीसीबी) – सेंट्रींगचे काम करत असलेल्या एका कामगाराचा चौथ्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (दि. 12) सकाळी 11 वाजता आकुर्डी गावठाण येथे मयुर समृद्धी फेज 2 या बांधकाम साइटवर घडली.

मुन्ना धरमदेव महतो (वय 21, रा. औहुरा, बिहार) असे मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे. याप्रकरणी ठेकेदार बसवराज चंद्रम दुदगी (वय 52, रा. जाधववाडी, चिखली) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सहाय्यक पोलीस निरीक्षक विजयकुमार धमाळ यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आकुर्डी गावठाण येथे मयूर समृद्धी फेज 2 या इमारतीचे काम सुरू आहे. सोमवारी सकाळी या इमारतीच्या चौथ्या मजल्यावर मयत कामगार मुन्ना सेंट्रींगचे काम करत होता. दरम्यान आरोपी ठेकेदार बसवराज याने कामगार मुन्ना याला सुरक्षेची साधने पुरवली नाहीत. मुन्ना सेंट्रींगचे काम करत असताना चौथ्या मजल्यावरून पडला. त्यामध्ये तो गंभीर जखमी झाला. त्याला तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र सोमवारी दुपारी तीन वाजता त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याबाबत सुरुवातीला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. त्यानंतर याप्रकरणी भारतीय दंड विधान कलम 304 प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे. निगडी पोलीस तपास करीत आहेत.