सुसंस्कृत घरातील मुलांनी प्रियंका गांधींपासून दूर रहावे – स्मृती इराणी

0
407

नवी दिल्ली, दि. २ (पीसीबी) – सुसंस्कृत घरातील मुलांनी प्रियंका गांधींपासून लांब रहावे. त्या  ज्या गोष्टींना प्रोत्साहन देत आहेत, त्यावरून त्यांची विचारसरणी दिसून येते,  अशी टीका केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांच्यावर केली आहे.  

प्रियंका गांधी यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओत काही मुले पंतप्रधान मोदींविरोधात अपशब्द वापरत घोषणाबाजी करत आहेत. तर अशा घोषणा देण्यापासून प्रियंका गांधी मुलांना रोखत आहेत. या व्हिडिओवरून  इराणी यांनी प्रियंका गांधींवर निशाणा साधला आहे.

प्रचाराच्या घोषणा देण्यासाठी तुम्ही लहान मुलांना कसे काय प्रोत्साहित करता? प्रियंका गांधी यांनीच पंतप्रधान   मोदींबाबत अपशब्द वापरण्यास मुलांना सांगितले. कुणी शिकवल्याशिवाय मुल असे कसे काय बोलतील? असाही प्रश्न स्मृती इराणी यांनी  केला आहे.

दरम्यान,  हा व्हिडिओ अर्धवट आहे. प्रत्यक्षात मुलांनी जेव्हा पंतप्रधान  मोदींबाबत अपशब्द वापरत घोषणा दिल्या.  तेव्हा मी त्यांना रोखले, असे प्रियंका गांधी यांनी म्हटले आहे.