सुशांत सिंह राजपूत प्रकरणात रिया चक्रवर्तीचे महत्वाचे सात खुलासे

0
490

मुंबई, दि. २७ (पीसीबी) – अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणात त्याची प्रेयसी आणि अभिनेत्री रिया चक्रवर्ती वादाच्या भोवऱ्यात आहे. मात्र, रियाने एका मुलाखतीत सर्व आरोप फेटाळून लावले. ‘आज तक’ या न्यूज चॅनलला दिलेल्या मुलाखतीत रियाने सुशांतला असलेल्या डिप्रेशनपासून ते त्याच्यासोबतच्या संबंधांपर्यंत अनेक विषयांवर चर्चा केली.

या मुलाखतीतले काही महत्त्वाचे खुलासे बघूया.
1. युरोप ट्रीप : “3 दिवस सुशांत खोलीतून बाहेरच पडले नाहीत”
सुशांतला कुठल्यातरी प्रकारचा मानसिक त्रास आहे, हे तुम्हाला कधी कळलं.
या मुलाखतीत रिया चक्रवर्तीने सांगितलं, “युरोप ट्रिपला जायच्या दिवशी सुशांतने सर्वांना सांगितलं की त्यांना विमान प्रवासाची भीती वाटते आणि त्यासाठी ते एक औषध घेतात. त्या औषधाचं नाव आहे ‘मोडॅफिनिल’. त्यांच्याकडे ते औषध कायम असायचं आणि विमान प्रवासाआधी त्यांनी स्वतःच ते औषध घेतलं होतं.”
“आधी आम्ही पॅरिसला गेलो. मात्र, सुशांत तीन दिवस आपल्या खोलीतून बाहेरच पडले नाही. खरंतर युरोप ट्रिपला जाण्याआधी ते खूप एक्साईटेड होते. त्यांचं म्हणणं होतं की तिथे मला कुणी ओळखणार नाही. आपण बाहेर रस्त्यावर फिरू शकू. माझा खरा स्वभाव तुला कळू शकेल. मात्र, तिथे गेल्यावर ते खोलीतून बाहेरच पडले नाही.”त्यानंतर आम्ही स्वित्झर्लंडला गेलो. तिथे ते खूप व्यवस्थित होते. ते खूश होते, बाहेर पडत होते. एनर्जी छान होती. त्यानंतर आम्ही एका हॉटेलमध्ये थांबलो. ते एक गॉथिक हॉटेल आहे. बुकिंगच्या आधी आम्हाला याची कल्पना नव्हती.
आमच्या खोलीत डोमसारखं स्ट्रक्चर होतं. विचित्र चित्रं होती. ते बघून मला खूप भीती वाटली. पण सुशांत म्हणाले – सगळं ठीक आहे. त्या रात्री त्यांना झोपच आली नाही. ते म्हणाले – इथे काहीतरी आहे. तर मी म्हणाले की वाईट स्वप्न पडलं असेल. एखादवेळी तुम्हाला एखादी जागा हॉटेंड वाटत असेल तर तुम्हाला असं वाटू शकतं की इथे काहीतरी आहे.
पण कधी-कधी हा भास असू शकतो. पण, सुशांत तेच ते सांगत होते. मग मी म्हणाले – आपण चेक आउट करू. तेही त्यांनी मान्य केलं नाही. त्यानंतर त्यांनी खोलीतून बाहेर पडणं हळू हळू बंद केलं. मी त्यांच्याशी बोलत होते. मग हळूहळू त्यांनी सांगितलं की 2013 साली त्यांच्यासोबत एक डिप्रेसिव्ह एपिसोड घडला होता.
त्यावेळी ते एका मानसोपचारतज्ज्ञाला भेटले होते. त्याच डॉक्टरांनी सुशांतला मोडॅफिलिन टॅबलेट प्रिस्क्राईब केलं होतं. त्यानंतर ते बरे होते. अधे-मधे कधीतरी त्यांना अँक्झाईटी अटॅक यायचे. पण, आता त्यांना जास्त अँक्शिअस आणि अधिक डिप्रेस्ड वाटत होतं. त्यामुळे आम्हाला ट्रीप तिथेच थांबवावी लागली. तुमचा पार्टनर कम्फर्टेबल नसेल तर तुम्ही काय कराल? ट्रिप सोडून त्याला परत त्याच्या घरीच नेणार ना?

2. रियाचा भाऊ शौविकही ट्रिपमध्ये होता सोबत
या ट्रिपचा खर्च आणि रियाचा भाऊ शौविकही ट्रिपमध्ये जॉईन झाला. या मुद्द्यावरूनही रियावर प्रश्नांची सरबत्ती सुरू आहे.
यावर बोलताना रियाने म्हटलं, “माझा भाऊ आणि सुशांत यांचेही खूप घनिष्ठ संबंध होते. त्यामुळे सुशांतनेच शौविकला इटलीला आग्रहाने बोलावून घेतलं होतं. खरंतर शौविकची CAT ची परीक्षा होती आणि त्याची इटलीला येण्याची अजिबात इच्छा नव्हती.”
शौविकला बोलवण्यासंदर्भातले सुशांतचे मेसेजेसही आपल्याकडे असल्याचं रियाचं म्हणणं आहे.

3. तिघांची कंपनी
या मुलाखतीत रियाने एका कंपनीविषयीही माहिती दिली. सुशांत, रिया आणि शौविक यांनी मिळून ती कंपनी स्थापन केल्याचं रियाचं म्हणणं आहे. ही कंपनी सुशांतचं ड्रिम प्रोजेक्ट होतं आणि आम्ही तिघांनी प्रत्येकी 33 हजार रुपये या कंपनीसाठी दिल्याचंही तिचं म्हणणं आहे.
मुलाखतीत रिया म्हणते, “शोविक, सुशांत आणि मी ट्रिपच्या काही दिवसांआधीच एक कंपनी स्थापन केली होती. त्या कंपनीचं नाव होतं ‘Rhealistix’ याचा अर्थ सुशांतला मी आवडतच असावी. कारण त्याचं ड्रिम प्रोजेक्ट असलेल्या आर्टिफिशिअल इंटेलिजंसच्या कंपनीचं नाव त्याने माझ्या नावाशी जोडलं होतं.
“कदाचित पुढे यासाठीही मीच दबाव टाकला, असाही आरोप माझ्यावर होऊ शकतो. या कंपनीत आम्ही तिघेही बरोबरीचे पार्टनर होतो. त्यासाठी आम्हाला प्रत्येकी 33 हजार रुपये भरायचे होते. माझ्या भावाचे पैसे मी त्याच्या खात्यात टाकले आणि मग त्याच्या खात्यातून कंपनीला गेले. कारण तो नोकरी करत नाही. त्यामुळे त्याच्याकडे पैसे नाही. या कंपनीत आम्ही टाकलेल्या 33 हजार रुपयांव्यतिरिक्त आमचं कुठलंच ट्रान्झॅक्शन नाही.”

4. “मी सुशांतच्या पैशावर जगत नव्हते”
युरोप ट्रिप, त्या ट्रिपमध्ये रिया, तिचा भाऊ त्यांचा सगळा खर्च आणि चक्रवर्ती कुटुंबाचाही खर्च सुशांत करत होता, असेही आरोप होत आहेत.
आज तकच्या मुलाखतीत रियाने हे सर्व आरोपही फेटाळले. ती म्हणाली, “पॅरिसमध्ये एका कपड्याच्या ब्रँडसाठी एक फॅशन शो होता. तिथे माझं शूट होतं. तिथलं माझं बिझनेस क्लासचं तिकीट आणि हॉटेल बुकिंग कंपनीने केलं होतं. ते तिकीट आणि बुकिंगही माझ्याकडे आहे. मात्र, ही सुशांतचीच कल्पना होती की यानिमित्ताने युरोप ट्रिप करूया.
“त्यांनीच माझी तिकीटं कॅन्सल केली आणि त्यानंतर आमचे तिकीट बुक केले. संपूर्ण ट्रिपमध्ये हॉटेल बुकिंगसाठीचे पैसे त्यांनीच भरले. कारण ते त्यांना करायचं होतं. मला त्यात काहीच वेगळं वाटलं नाही. उलट मला या गोष्टीचा त्रास होत होता की ते खूप जास्त खर्च करत होते. मला वाटलं की मोठी ट्रिप आहे. जास्त खर्च होतोय. मात्र, ते असंच जगायचे. किंग साईज.”
सुशांतच्या या जगण्याबद्दल तपशीलवार सांगताना रियाने वर्ष-दिड वर्षापूर्वी सुशांतच्या थायलंड ट्रिपविषयीही सांगितलं. ती म्हणाली, “एक-दोन वर्षांपूर्वी सुशांत त्यांच्या सहा मित्रांसोबत थायलँडच्या ट्रिपवर गेले होते. त्या ट्रिपमध्ये त्यांनी 70 लाख रुपये खर्च केले. एक प्रायव्हेट जेट ते घेऊन गेले होते.”
“या सुशांतच्या लाईफस्टाईल चॉईजेस होत्या. तुम्ही त्याला सांगणारे कोण की त्याने फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये थांबायला हवं की नको, आपल्या गर्लफ्रेंडला सोबत न्यावं की नको? त्याची इच्छा. ते एका स्टारप्रमाणे जगायचे. एखाद्या राजासारखे जगायचे. त्यांना ते आवडायचं. ते इतर मुलांनाही सोबत घेऊन गेले होते. त्यांनीही सुशांतवर दबाव टाकला होता का? मी सुशांत सिंह राजपूतच्या पैशावर जगत नव्हते. आम्ही एका जोडप्यासारखं राहत होतो.”

5. सुशांतचं पार्थिव बघून सॉरी बाबू” का म्हणाली रिया?
“14 तारखेला मी दुपारी दोनच्या सुमाराला माझ्या भावासोबत माझ्या घरी, माझ्या खोलीत होते. माझ्या एका मैत्रिणीचा मला कॉल आला की अशाप्रकारच्या अफवा आहेत. या अफवा ताबडतोब थांबव. तेव्हा तिला माहिती नव्हतं की मी सुशांतच्या नाही तर माझ्या घरी आहे. ती मला म्हणाली की सुशांतला म्हण की लगेच स्टेटमेंट काढ. तेव्हाच माझ्या मनात आलं की अशा अफवा कशा असतील आणि त्याच 10-15 मिनिटात बातमी कन्फर्म झाली होती. मला मोठा धक्का बसला होता.”
GRAM/SSR
“असं कसं घडू शकतं, हेच मला कळत नव्हतं. नंतर मला कळलं की त्यांच्या अंत्यसंस्कारच्या पाहुण्यांच्या यादीत माझं नाव नाही. इंडस्ट्रीतल्या अनेकांची नावं त्यात होती. पण माझं नाव नव्हतं आणि नाव नसल्यामुळे मला तिथे जाताही येणार नव्हतं. कारण सुशांतच्या कुटुंबीयांना मी तिथे नको होते. माझी जायची तयारी नव्हती. पण इंडस्ट्रीमधल्या काही मित्रांनी फोनवरून आणि एकाने घरी येऊन मला सांगितलं की तिथे जाऊ नकोस. तिथून ते तुला काढून टाकतील. तुझा अपमान होईल. तुझी मानसिक स्थिती तशीही बरी नाही.”
“सुशांतला कधी बघता येईल, याची मी दुपारपासूनच वाट बघत होते. त्यामुळे माझ्या मित्रांनीच मला सांगितलं की सुशांतला एकदा शेवटचं बघणं तुझ्यासाठी खूप गरजेचं आहे. नाहीतर असं काही घडलं आहे, याचा तू स्वीकारच करणार नाही.”
“तिथे गेल्यावर मी सॉरी बाबू म्हटलं. पण एखादी व्यक्ती जग सोडून गेल्यानंतर तिला भेटायला जाणारी दुसरी व्यक्ती तिला आणखी काय म्हणणार? तू तुझं आयुष्य संपवलंस याबद्दल मला दुःख आहे, हेच म्हणणार ना? आणि आज मला म्हणायचं आहे की तुमच्या मृत्यूचीही यांनी थट्टा मांडली आहे, याबद्दलही मला वाईट वाटतंय. तू केलेलं चांगलं काम, तुझी बुद्धीमत्ता किंवा तू केलेली चॅरिटी या आज तुझ्या शेवटच्या आठवणी नाहीत, याचंही मला वाईट वाटतंय. मी सॉरी म्हटलं, त्याचाही वेगळा अर्थ काढण्यात आला.”

6. हार्ड ड्राईव्ह डिलिट होण्यामागचं वास्तव
सुशांतच्या घरातल्या एका मदतनीसाने पोलिसांना असं सांगितलं आहे की सुशांत्या मृत्यूच्या काही दिवसांपूर्वीच रियाने एका आयटीच्या माणसाला बोलावून सुशांत समोरचं एक हार्ड ड्राईव्ह डिलीट केलं होतं. रियाने आपल्या मुलाखतीत या आरोपावरही उत्तर दिलं आहे.A CHAKRABORTY/INSTAGRA
ती म्हणते, “हे पूर्णपणे निराधार आरोप आहे. अशा कुठल्याच हार्ड ड्राईव्ह विषयी मला माहिती नाही. मी जोवर घरी होते तोवर कुणीही घरी आलं नाही. मी गेल्यानंतर त्यांची बहीण 8 ते 13 जूनपर्यंत तिथे होत्या. त्यांच्या उपस्थितीत असं काही झालं असेल तर त्यांना त्याची कल्पना असेल. माझ्या उपस्थितीत असं काहीही घडलं नाही.”

7. सुशांतला कुटुंबापासून तोडल्याचा आरोप
रियाने सुशांतच्या घरातल्या सर्व मदतनीसांना बदललं. त्यांना त्यांच्या कुटुंबीयांपासून तोडलं, सुशांतच्या सर्व गोष्टी रियाने स्वतःच्या हातात घेतल्या, या आरोपांवरही रिया चक्रवर्तीने मुलाखतीत स्पष्टीकरण दिलं आहे.STAGRAM
ती म्हणते, “हा अत्यंत निराधार आरोप आहे. सिद्धार्थ पिटानीला सुशांत माझ्या आधीपासून ओळखायचे. मी सुशांतच्या घरी गेलो त्यावेळी सिद्धार्थ पिटानी आधीपासूनच सुशांतसोबत त्यांच्या घरात रहायचे. दुसऱ्या मिरँडा, ज्या त्यांच्या हाउस मॅनेजर आहेत त्यांना सुशांतची बहीण प्रियंका यांनी कामावर ठेवलं होतं. तेही मी गेले त्याआधीपासूनच होत्या. तिसरे त्यांचे कूक केशव आणि त्यांचे क्लिनर नीरज या सर्वांना सुशांत यांनी मी तिथे गेले त्याआधीपासून कामावर ठेवलं होतं. दिपेश. त्यांनाही सुशांत पूर्वीपासूनच ओळखायचे. मी कुठलाच स्टाफ हायर केला नाही. मी त्यांना ओळखतही नव्हते. सुशांतनेच त्यांची ओळख करून दिली होती.”