सुशांत मृत्यु प्रकरणात ‘हे’ नवीन नाव आलं समोर; ईडी करणार आज कसून चौकशी

0
215

मुंबई, दि.३१(पीसीबी) : अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यु प्रकरणात आज ईडी रिया चक्रवर्ती आणि गौरव आर्यामध्ये ड्रग्स कनेक्शन नक्की आहे कि नाही? याची चौकशी करणार आहे.

सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणामध्ये आता ड्रग्सचा अँगल समोर येत आहे. गोव्यामध्ये झालेल्या रेव्ह पार्टीतील गौरव आर्या हा आरोपी आहे. रिया आणि गौरव च्या व्हॉट्सअॅप चॅटमधुन या दोघांमध्ये ड्रग्स कनेक्शन असल्याच समोर आलं होतं. त्यामुळे ईडीने गौरव आर्याला 31 ऑगस्टला चौकशीसाठी मुंबई कार्यालयात हजर रहायला सांगितलं आहे. ‘मी सुशांतसिंह राजपूतला कधी भेटलोच नाहीये परंतु रियाला मी 2017 साली भेटलो आहे. असं गौरवने माध्यमांशी बोलताना स्पष्ट केलं आहे.

रविवारी सायंकाळी गौरव मुंबई विमानतळावर आला असता त्या दरम्यान मीडियाने विचारलेल्या प्रश्नांना उत्तरं द्यायला त्याने नकार दिला आणि “माझा सुशांतसिंह राजपूतच्या मृत्युशी कोणताच संबंध नाही”, असं तो म्हणाला आहे. फक्त ईडीच नाही तर नंतर सीबीआय आणि एनसीबीचे अधिकारीसुद्धा त्याची आता कसून चौकशी करणार आहेत. रिया आणि गौरववर नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने गुन्हा दाखल केला आहे. आता लक्ष नंतरच हे समोर येईल कि, नक्की सुशांतसिंग प्रकणाला खरच ड्रग्स अँगल आहे कि, हा ड्रग्स अँगल जाणून बुजून देण्यात आला आहे, हे समोर येईल.