सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात मॅनेजर श्रुती मोदीचे सीबीआयकडे धक्कादायक खुलासे

0
447

मुंबई, दि.३(पीसीबी) : अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात आता ड्रुग्स अँगल समोर आला आहे. सीबीआयकडून चालू असलेल्या कडक चौकशीमुळे सुशांत आत्महत्या प्रकरणाचे वेगवेगळे धागेदोरे हाती सापडत आहेत.

सीबीआयने रिया चक्रवर्ती हिच्यापासून ते अगदी सुशांतच्या घरात काम करणारे कर्मचारी, त्याच्या संपर्कातील व्यक्ती, त्याच्या कुटुंबातील काही सदस्य यांची सुद्धा चौकशी केली आहे. यातच आता सीबीआयच्या हाती ड्रग्ज कनेक्शन संदर्भात माहिती आल्यामुळे सुशांत आत्महत्या प्रकरणाला वेगळं वळण मिळालं आहे. ‘सुशांतसह काम करणारे बरेच लोक ड्रग्जच्या आहारी गेले होते. शिवाय त्याच्या घरीसुद्धा ड्रग्जचा वापर केला जात असल्याचा दावा सुशांतची मॅनेजर म्हणून काम पाहणाऱ्या श्रुती मोदी हिनं केला आहे.

‘टाईम्स ऑफ इंडिया’नं प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार सुशांत कासेची नवी बाजू समोर आली आहे. ‘सुशांतच्या जीवनशैलीमध्ये ड्रग्ज होते हे खरं. आपण फक्त सुशांतचं काम करायचो आपला अंमली पदार्थांशी काहीही संबंध नाही. अशी कबुली तिनं सीबीआयकडे दिली आहे. शिवाय, इतकंच नव्हे, तर सुशांतची कथित प्रेयसी रिया चक्रवर्ती हिचा भाऊ शौविक आणि सुशांतचे काही कर्मचारी ड्रग्जच्या आहारी गेले होते. सुशांतलाही यामध्ये बळजबरीनं सहभागी होण्यास सांगितलं जात असे, असा गौप्यस्फोट श्रुती मोदीने केला आहे. श्रुतीनं सीबीआय कडे केलेले हे खुलासे पाहता सुशांत आत्महत्या प्रकरण तपासाला आता वेगळी दिशा मिळाल्याचं दिसतंय.